पैशांसाठी चिमुकलीने खाल्ली मिर्ची? भावूक करणाऱ्या Video मागचं सत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girl Eating chilly for Money Video Viral

पैशांसाठी चिमुकलीने खाल्ली मिर्ची? भावूक करणाऱ्या Video मागचं सत्य

गरिबी व्यक्तीला काही करण्यासाठी भाग पाडू शकते. पैशांच्या गरजेसाठी व्यक्ती स्वत:ला नुकसान पोहचवू शकतो. अशावेळी ते चांगल- वाईट, योग्य-अयोग्य कसला विचार करत नाही. गरिबी लहान मुलांचे बालपणही हिरावून घेते. असाच काहीसा प्रकार एका व्हायरल (Poverty Viral Video) व्हिडिओमध्ये दिसून येतो. सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला ज्यामध्ये असा दावा केला आहे की, एक गरीब चिमुकली पैशांसाठी हिरवी मिर्ची खात (Poor Girl Eating chilly for Money Video)आहे.

हेही वाचा: बर्फाच्या तुफान वर्षावातही ऑन ड्युटी 24 तास; आर्मी मॅनचा व्हिडिओ व्हायरल

सन २०२०मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ७-९ वर्षांची मुलगी जमिनीवर बसलेली आहे. तिने जुने कपडे घातले आहे, त्यावरून ती गरीब असल्याचा अंदाज लोकांनी बांधला आहे. व्हिडिओमध्ये ही चिमुकली एका नंतर एक हिरवी मिर्ची खात आहे. (Girl Eating Hari Mirch for Money)या व्हिडिओमध्ये असा दावा केला आहे की ही चिमुकलीला मिर्ची खाण्याची कला दाखवत आहे, ज्यामुळे व्हिडिओ बनविणारा व्यक्ती असा विचित्र व्हिडिओ सोशल मिडियावर टाकू शकतो आणि त्याबदल्यात पैसै मिळतील. नुकताच हा व्हिडिओ सोशल मिडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे.

काय आहे या व्हिडिओ मागचं सत्य?

आता प्रश्न आहे की, या व्हिडिओच्या मागचं सत्य काय आहे. आपल्याला माहित आहे की, सोशल मिडियावर जे पण आपण पाहतो ते खोटं असते किंवा अर्धवट सत्य असते. अशावेळी प्रश्न पडतो की या व्हिडिओमध्ये केलेला दावा किती सत्य आहे? याबाबत माहिती घेतली तेव्हा व्हिडिओचे सत्य समोर आले.

हेही वाचा: हमाल करी कमाल! UPSC मध्ये मारली बाजी

व्हिडिओ खरा आहे पण दावा खोटा

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या काकाने हा व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना आणखी एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की मिर्ची खाणाऱ्या मुलीचा व्हिडिओ गंमत म्हणून शेअर केला होता त्यामध्ये कोणतेही सत्य नाही.

अहमद फराज नावाच्या व्यक्तीने सांगितले की, ''लोकांनी इतक्या पटकन अंदाज नाही बांधला पाहिजे. आपल्या या कॉमेंट सोबत त्यांनी दुसरा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्या मुलीने चांगले आणि स्वच्छ कपडे घातले आहे पण तरीही लोक त्या कपड्यांना नाव ठेवत आहेत.

लोक असेही म्हणत आहे की, ''व्हिडिओमध्ये केलेला दावा खोटा असला तरी छोटयाशा मुलीला एवढी हिरवी मिर्ची खायला देणे तिच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मुलांसोबत अशी गंमत केल्यामुळे सोशल मिडियावर लोकांनी नाराजी व्यक्ती केली आहे.

Web Title: Poor Girl Eating Chili For Money Fact Checking Of Viral Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :video viralyoung girl
go to top