Farmer Protest: 'तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही'; रिहानाच्या ट्विटनंतर अमित शहांचं प्रत्युत्तर

amit shah
amit shah

नवी दिल्ली- शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापले असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरुन प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी शेतकऱ्यांना उघडपणे समर्थन दर्शवलं आहे, तर काहींनी विरोध केला आहे.  भारत सरकाच्या विदेश मंत्रालयाने बुधवारी आपले वक्तव्य जारी केले, केंद्र सरकारच्या अनेक मंत्र्यांनी IndiaAgainstPropaganda आणि IndiaTogether या हॅशटॅगचा वापर करत ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे. 

World Cancer Day : जगात मिनिटाला १७ जणांचा कर्करोगाने मृत्यू; जाणून घ्या लक्षणं...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करत या मुद्द्यावर भाष्य केलं. कोणताही दुष्प्रचार भारताच्या एकतेला संपवू शकत नाही. कोणताही दुष्प्रचार भारताला विकासाची नवी उंची गाठण्यापासून रोखू शकत नाही. भारत एकसंध आहे आणि एकसंध राहूनच पुढे वाटचाल करेल. प्रोपेगेंडा भारताचे भविष्य ठरवू शकत नाही, असं केंद्रीय गृहमंत्री म्हणाले आहेत. पॉप स्टार रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनात ट्विट करत म्हटलं होतं की, 'आपण शेतकऱ्यांची चर्चा का करत नाही आहोत'

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनीही ट्विट केलं आहे. कोणत्याही मुद्द्यावर टिप्पणी करण्याआधी तथ्य काय आहेत ते योग्यपणे जाणून घेणे आवश्यक आहे.  प्रकरणाविषयी ज्ञान असेल तर आपले मत ठेवायला हवे, असं त्या म्हणाल्या आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही रिहानाच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. हे आमचे अंतर्गत प्रकरण आहे. आमची मागणी आहे की कायदे मागे घ्यावेत. या व्यतरिक्त मला काहीही बोलायचं नाही, असं ते म्हणाले आहेत. 

ग्रेटा Exposed! जागतिक पातळीवरील समर्थनासाठीचे डॉक्यूमेंट्स ट्विट करुन पुन्हा...

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तिने म्हटलंय की, भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. सुप्रसिद्ध जागतिक पॉप आयकॉन सुपरस्टार रिहाना हिने देखील शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न उपस्थित केला. तिने सीएनएन या वृत्तसंस्थेची बातमी शेअर करत भारतात सुरु असणाऱ्या  शेतकरी आंदोलनाला दडपण्यासाठी इंटरनेट सुविधा बंद केली असल्याचं म्हटलं आहे. आपण या शेतकरी आंदोलनाबाबत का बोलत नाही? असं ती म्हणाली होती.

तिचे हे ट्विट अगदी कमी वेळातच व्हायरल झाले आणि त्यावर चर्चा सुरु झाली. तिचे हे ट्विट ट्रेंडमध्ये आले. तिच्या या ट्विटवर जगभरातून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. भारतरत्न पुरस्कार प्राप्त क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी ट्विट करत रिहानाला सुनावलं आहे. आमच्या अंतर्गत प्रकरणात कोणी पडू नये. भारत एकसंध आहे, असं ते म्हणाले आहे. भारतरत्न प्राप्त गायीका लता मंगेशकर यांनीही आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांना विरोध केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com