
जगात चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. याचा उद्देश लोकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करणं हा आहे. जागतिक कर्करोग दिनाची तीन वर्षांसाठी एक थीम ठरवण्यात येते. यावेळी ती थीम 'मी आहे आणि राहीन' अशी २०१९ ते २०२१ या कालावधीसाठी आहे.
जगात चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. याचा उद्देश लोकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करणं हा आहे. जागतिक कर्करोग दिनाची तीन वर्षांसाठी एक थीम ठरवण्यात येते. यावेळी ती थीम 'मी आहे आणि राहीन' अशी २०१९ ते २०२१ या कालावधीसाठी आहे. कर्करोगाच्या या थीमचा अर्थ असा आहे की, कर्करोग झालेली व्यक्ती इच्छाशक्तीच्या जोरावर या आजारावर मात करू शकते.
कर्करोग आता लोकांसाठी नवा नाही. जवळपास प्रत्येकाने याचं नाव ऐकलं आहे आणि आपल्या आजुबाजुला अशा लोकांना पाहिलं आहे, गमावलं आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योग्य वेळी कर्करोग ओळखता आला तर त्यावर उपचार होऊ शकतात. अद्याप यावर कोणताही उपचार नाही किंवा निश्चित असा उपचारही नाही.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार जगात प्रत्येक मिनिटाला १७ जणांचा मृत्यू फक्त कर्करोगाने होतेय. २०१८ मध्ये भारतात जवळपास ११ लाख ५७ हजार कर्करोगाचे रुग्ण आढळले होते. यापैकी ७ लाख ८४ हजार जणांचा मृत्यू झाला होता.
ग्रेटा Exposed! जागतिक पातळीवरील समर्थनासाठीचे डॉक्यूमेंट्स ट्विट करुन पुन्हा डिलीट
शरीर हे पेशींपासून बनलेलं असतं. या पेशींची वाढ अनियंत्रित होते आणि शरीरात पसरायला लागते. यामुळे शरीराच्या इतर अवयवांच्या कार्यावर परिणाम होतो. या पेशी ज्या भागात वाढतात तिथं गाठ तयार होते यालाच कर्करोग म्हटलं जातं.
स्तनांमध्ये गाठ असणं किंवा इतर बदल, आतडे, मूत्राशय इत्यादीमधून रक्तस्राव, बराच काळ खोकला, शरीरातून रक्तस्राव किंवा एखादा द्रव बाहेर पडणं, वजनात एकदम वाढ किंवा घट यांसारखी वेगवेगळी लक्षणं यामध्ये असतात.
कर्करोगापासून वाचण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये धूम्रपान, तंबाखू यांचे सेवन टाळणे. जास्त वजन वाढणार नाही याची काळजी घेणे, अल्कोहोल तसंच फास्टफूडचं प्रमाण कमी असावं. दररोज व्यायाम आणि पौष्टिक आहार घेणे. नियमित आरोग्य तपासणी करावी आणि अल्ट्राव्हायोलेय किरणांपासून दूर रहावं.
Edited By - Prashant Patil