आदर्शवत नर्स! मूकबधिर रुग्णांसाठी ऑनलाइन शिकली सांकेतिक भाषा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदर्शवत नर्स! मूकबधिर रुग्णांसाठी ऑनलाइन शिकली सांकेतिक भाषा

आदर्शवत नर्स! मूकबधिर रुग्णांसाठी ऑनलाइन शिकली सांकेतिक भाषा

कोरोना महामारीच्या (covid-19) या संकटामध्ये डॉक्टर, नर्स (nurse), आरोग्यसेवक, पोलीस यांच्या रुपाने देव आपल्याला मदत करत आहे. कोरोना संकटात सर्वजण आपल्या जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करत आहेत. अशाच एका नर्सची आदर्शवत कथा सध्या व्हायरल होत आहे. कोरोनाबाधित मूकबधिर रुग्णांचा उपचार करता यावा म्हणून नर्सनं (nurse) ऑनलाइन सांकेतिक भाषा (Sign Language) शिकली आहे. या नर्सचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

मूकबधिर रुग्णांना उपचार देण्यासाठी सांकेतिक भाषा शिकलेल्या या नर्सचं नाव स्वाती असं आहे. छत्तीसगढमधील रेल्वे रुग्णालयात ती कार्यरत आहे. छत्तीसगढ (chhattisgrah) रेल्वे रुग्णालयात स्वाती कोविड वार्डात आपलं कर्तव्य बजावत आहे. येथे काही रुग्ण मूकबधिरही आहेत. या रुग्णांसोबत बातचित करण्यासाठी स्वाती ऑनलाइन सांकेतिक भाषा (Sign Language) शिकली आहे. मूकबधिर रुग्णांसोबत सांकेतिक भाषेत बोलतानाचा स्वातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेल्वेनेही आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर स्वातीचा व्हिडिओ पोस्ट करत कौतुक केलं आहे.

हेही वाचा: कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांसाठी तरुण बनला देवदूत; स्वतःच्या गाडीला रुग्णवाहिका बनवून दिवसरात्र सेवा

मूकबधिर रुग्णांचा उपचार करताना स्वातीला अडचणींचा सामना करावा लागत होता. तिला त्यांची भाषा समजत नव्हते. तसेच रुग्ण काय म्हणतात, हेही समजत नव्हतं. त्यामुळे उपचार करताना अडचणी येत होत्या. यावर उपाय काढण्यासाठी स्वातीनं ऑनलाइन सांकेतिक भाषा (Sign Language) शिकण्याचा निर्णय घेतला. सांकेतिक भाषा शिकल्यानंतर स्वाती मूकबधिर रुग्णांचा उपचार अधिक चांगल्या पद्धतीनं करत आहे.

पाहा व्हिडिओ -

स्वातीनं आपल्या या आदर्शवत कामगिरीनं फक्त मूकबधिर रुग्णांसोबतच सर्वांचं मन जिंकलं आहे. सोशल मीडियावर स्वातीच्या या आदर्शवत कामगिरीचं कौतुक होत आहे.

Web Title: Positive News Chhattisgrah Bilaspur News Nurse Swati Learn Sign Language To Treat Deaf And Dumb Covid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirus
go to top