...तर थंडीत कोरोनाचे रुग्ण वाढतील

...तर थंडीत कोरोनाचे रुग्ण वाढतील
Updated on

नवी दिल्ली - आगामी हिवाळा तसेच दिवाळीसह सणासुदीचा कालावधी लक्षात घेता निर्बंधांचे पालन झाले नाही तर कोरोना रुग्णांची संख्या वाढेल, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. थंडीमुळे संसर्ग वाढेल का, या प्रश्नावर त्यांनी ब्रिटन तसेच ब्रिटन तसेच युरोपचे उदाहरण दिले. थंड वातावरणामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता फेटाळता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच सणाच्या काळात बेफिकीर राहून चालणार नाही. दोन फूट अंतर, मास्कचा वापर अशा निर्बंधांचे पालन सुरू ठेवावे. घरात थांबूनच सण साजरा करावा, बाहेर पडू नये, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लस उपलब्ध होईल तेव्हा आणीबाणीच्या वापराच्या अधिकारानुसार कुणाला आधी लस द्यायचा याचा निर्णय सरकारने घेतला नसल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या स्पष्ट केले.

लोकांचा  जीव धोक्यात घालून सण साजरे करा  असा संदेश जगातील कोणताही धर्म अथवा देव कदापि देत नाहीत. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनआंदोलन गांभीर्याने घ्यावे लागेल.
- डॉ. हर्षवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com