esakal | भाजपकडून सत्तेच्या गैरवापराची शक्यता- अखिलेश यादव
sakal

बोलून बातमी शोधा

akhilesh

भाजपकडून सत्तेच्या गैरवापराची शक्यता- अखिलेश यादव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनौ: उत्तर प्रदेशात राजकीय फायद्यासाठी भाजपकडून सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी, भाजप मतदान केंद्रांवर लक्ष ठेवून आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजिबात वेळ न दडवता काम करावे, असे आवाहनही त्यांनी जारी केलेल्या निवेदनात केले आहे.

हेही वाचा: 'अब्बाजान' योगींना भोवणार; मुजफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर कोणताही ढिसाळपणा असता कामा नये. आपल्याला दुसरी संधी मिळणार नाही, हे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विसरू नये. लोकशाहीचा सण असलेल्या निवडणुकांचे पावित्र्य राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी सावध राहावे. त्याचप्रमाणे, ठोस धोरण आखावे. त्यामुळे भाजप जनतेला फसवू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

उत्तर प्रदेशमधील आर्थिक प्रगती दाखविण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने कोलकत्यातील उड्डाणपुलाची कथित प्रतिमा वापरल्यावरून वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात बोलताना अखिलेश यादव म्हणाले, की जिथे चांगले काम केले आहे, तिथे ते आपल्यामुळे झाल्याचा दावा करण्यास भाजपने कधी संकोच केला नाही.

loading image
go to top