esakal | 'अब्बाजान' योगींना भोवणार; मुजफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

'अब्बाजान' योगींना भोवणार; मुजफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल

'अब्बाजान' योगींना भोवणार; मुजफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुजफ्फरपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे चर्चेत असतात. काल उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये बोलत असताना, योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. योगी आदित्यनाथ यांनी भाजप सरकारच्या काळात सर्वांना समान न्याय मिळतो हे सांगताना पुर्वी फक्त 'अब्बाजान' म्हणणाऱ्यांना रेशन मिळायचे असे वक्तव्य केले होते. त्यांचं हे वक्तव्य आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: योगींच्या 'अब्बा जान'च्या वक्तव्यावर काँग्रेसनं दिलं प्रत्युत्तर

अब्बाजान शब्दाच्या वापरावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध सोमवारी याचिका दाखल करण्यात आली. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तमन्ना हाश्मी यांनी मुजफ्फरपूर येथील मुख्य न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. योगी यांच्या वक्तव्यामुळे आपण ज्या मुस्लीम समाजाच्या आहोत त्यांचा अपमान झाल्याचा आरोप हाश्मी यांनी केला.

योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कुशीनगर येथील एका कार्यक्रमात हा शब्द उच्चारला होता. ते म्हणाले होते की, २०१७ मध्ये मी सत्तेवर आल्यानंतरच उत्तर प्रदेशातील सार्वजनिक धान्यवितरण व्यवस्था परिणामकारक बनली. त्याआधी गरिबांसाठी राखून ठेवण्यात आलेले धान्य जे अब्बाजान म्हणायचे त्यांच्याकडून खाल्ले जायचे.

हेही वाचा: भारतानं पूर्ण केला 75 कोटी लसीकरणाचा टप्पा; WHOकडून कौतुक

हाश्मींकडून असंख्य याचिका

हाश्मी यांनी याआधीही अनेक राजकीय नेत्यांविरुद्ध असंख्य याचिका दाखल केल्या आहेत. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून योगींवर कारवाई व्हावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. या याचिकेवर कामकाजाच्या नियमांनुसार सुनावणी होण्याची शक्यता आहे.

कपिल सिबल यांची टीका

त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना, २०१७ पुर्वी कुशीगरमध्ये सर्वांना रेशन मिळत होतं का? असा प्रश्न केला. तसेच तेव्हा फक्त अब्बाजान म्हणणाऱ्या लोकांना रेशन मिळत होतं असं सांगितलं. त्यावर प्रतिउत्तर देत आता काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी योगींवर निशाना साधला आहे. "आपल्या सरकारला सर्व समावेशक अफगाणिस्तान पाहिजे आहे, मात्र अब्बा जानचे वक्तव्य करणाऱ्या योगींना काय पाहिजे? सर्वसमावेशक उत्तर प्रदेश की, फोडा आणि राज्य करा?" असे म्हणत सिब्बल यांनी योगींना प्रश्न केला आहे. सिब्बल यांनी ट्विट करत हे मत मांडलं आहे.

loading image
go to top