टपाल विभागाच्या परीक्षाही आता प्रादेशिक भाषांमध्ये

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जुलै 2019

नवी दिल्ली : बँकांत प्रमाणेच टपाल विभागातील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षाही आता हिंदी व इंग्रजी प्रमाणेच मराठीसह सर्व म्हणजे 22 प्रादेशिक भाषांमध्येही घेण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत दिले. या गोंधळामुळे आज राज्यसभेचा प्रश्नोत्तर तासात आणि शून्य तास चालू शकला नाही.

नवी दिल्ली : बँकांत प्रमाणेच टपाल विभागातील भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षाही आता हिंदी व इंग्रजी प्रमाणेच मराठीसह सर्व म्हणजे 22 प्रादेशिक भाषांमध्येही घेण्यात येतील असे आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज राज्यसभेत दिले. या गोंधळामुळे आज राज्यसभेचा प्रश्नोत्तर तासात आणि शून्य तास चालू शकला नाही.

टपाल विभागाच्या आगामी महिन्यात होणाऱ्या परीक्षा हिंदी इंग्रजीत घेण्यात येणार असून तमिळ व सर्व भारतीय भाषांमध्ये घ्याव्यात या मागणीसाठी अण्णा द्रमुक व द्रमुकने आज राज्यसभेचे कामकाज पूर्वार्धात रोखून धरले. प्रसाद यांनी तातडीने सभागृहात येऊन स्पष्टीकरण करावे अशी त्यांची मागणी होती मात्र आपल्याला याबाबत सविस्तर माहिती घ्यावी लागेल लगेच देता येणार नाही  व उद्या सकाळी आपण राज्यसभे समोर येऊ, असे प्रसाद यांच्याकडून सांगण्यात आले. या गोंधळामुळे आजच्या संपूर्ण दिवसाचे कामकाज पाण्यात जाण्याची चिन्हे दिसल्यावर त्यावर राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी प्रसाद यांना लवकरात लवकर सभागृहात येण्याची सूचना केली.

प्रसाद यांनी दुपारी अडीच वाजता सांगितले की, टपाल खात्याच्या परीक्षेबाबत सर्व माहिती घेतली या प्रकरणाचा आढावा घेतला असता केबल हिंदी आणि इंग्रजीतून परीक्षा घेतल्याने राज्यांमधील स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो या म्हणण्यात तथ्य आहे त्यामुळे टपाल विभागाच्या परीक्षा तमिळ सहज सर्व नाशिक भाषांमध्ये घेतल्या जाव्यात असा आदेश आपण तातडीने दिला आहे. प्रसाद यांच्या या घोषणेनंतर अण्णाद्रमुक आणि काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांचे आभार मानले.

मोदी सरकार सर्व भारतीय भाषांचा आदर करते आणि मी स्वतः तामिळनाडूचा प्रभारी असताना तमिळ भाषेच्या समृद्धीचा अनुभव घेतलेला आहे असे प्रसाद यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या आणि निमलष्करी दलांच्या सर्व भरती परीक्षांच्या संदर्भात हाच मुद्दा वारंवार वादाचा बनत असतो त्यामुळे सर्व या प्रादेशिक भाषांमध्येही घ्याव्यात असा धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी टिके रंगराजन आणि आनंद शर्मा यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: post department exams is in now regional languages