'राहुल गांधी राम तर नरेंद्र मोदी रावण'

'राहुल गांधी राम तर नरेंद्र मोदी रावण'

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा मध्य प्रदेश राज्यात एक दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पोस्टरबाजी केली गेली. यामध्ये 'राहुल गांधी राम तर नरेंद्र मोदी रावण' असल्याचे पोस्टर राज्यात झळकत आहेत. हे पोस्टर्स भोपाळमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

राज्यातील भोपाळमध्ये राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी भोपाळमध्ये ठिकठिकाणी पोस्टर्स लावली आहेत. विशेष म्हणजे या पोस्टर्सवर राहुल गांधी यांना भगवान रामाच्या अवतारात दाखवण्यात आले. तर पंतप्रधान मोदी हे दहा तोंडे असलेले रावण दाखवण्यात आले आहेत. पोस्टरवर 'चौकीदार चोर हैं' असा उल्लेखही करण्यात आला आहे. राहुल गांधी हेच राम मंदिर बनवतील, असा मजकूरही यामध्ये लिहिण्यात आला आहे. 

तसेच 'चोरों तुम्हारी खैर नहीं, हम राम भक्त है. चोरों के अलावा किसी से बैर नहीं' असेही या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com