

indigo
IndiGo Flight Incident: Power Bank Fire Triggers Emergency : इंडिगोच्या विमानात पॉवर बँकला आग लागल्याची घटना घडलीय. हैदराबाद चंदिगढ विमानात मंगळवारी घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली. चंदिगढमध्ये विमान उतरल्यानंतर हा प्रकार घडला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलंय. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.