प्रसिद्ध आयडियल आईसक्रीमचे संस्थापक प्रभाकर कामथ याचं निधन

आठवड्याभरापूर्वी त्यांचा गंभीर अपघात झाला होता.
Ideal Icecream_Prabhakar Kamath
Ideal Icecream_Prabhakar Kamath
Updated on

मंगळुरु : कर्नाटकमधील मंगळुरु शहरातील प्रसिद्ध आईसक्रीम ब्रँड आयडियल आईसक्रीमचे संस्थापक प्रभाकर कामथ यांचं शनिवारी (दि.६) सकाळी निधन झालं. आठवड्याभरापूर्वी त्यांचा गंभीर अपघात झाला होता. यावर उपचार सुरु असताना रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.

द हिंदूच्या वृत्तानुसार, बेजाई येथे २८ ऑक्टोबर रोजी त्यांना एका स्कूटरने जोरदार धडक दिली होती. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर मंगळुरुतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या ठिकाणी उपचारांदरम्यानच त्यांचं निधन झालं.

Ideal Icecream_Prabhakar Kamath
हृषिकेश देशमुख यांच्याही वाढणार अडचणी? अटकपूर्व जामीन लांबला!

दरम्यान, त्यांनी सन १९७५ मध्ये आयडियल आईसक्रीम ब्रॅण्डची स्थापना केली होती. पुढे हा देशातील एक अग्रगण्य आईसक्रीम ब्रॅण्ड बनला. मंगळुरु शहरात आयडीयलची पाच आईसक्रीम पार्लर आहेत. त्याचबरोबर तीन राज्यांमध्ये या आईसक्रीम ब्रँडची रिटेल आउटलेट्स आहेत.

Ideal Icecream_Prabhakar Kamath
नगर अग्नितांडव : मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

मंगळुरु साउथचे आमदार डी. वेदव्यास कामथ, खासदार नलिनकुमार कातिल आणि इतर मान्यवरांनी प्रभाकर कामथ यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com