

कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस बजावली असल्याची माहिती मुर्शिदाबाद येथील भारत सेवाश्रम संघाचे स्वामी प्रदीप्तानंद महाराज यांनी दिली. संघटनेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ममता यांनी माफी मागावी असे नोटिशीत म्हटले आहे.
‘‘ममता यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली असती तर मी त्यांना नोटीस पाठवली नसती, कारण मी एक सन्यासी असून या सर्वांच्या पलिकडे गेलो आहे, पण त्यांनी सेवाश्रम संघाबद्दल केलेले वक्तव्य हे आक्षेपार्ह आहे,’’ असे प्रदीप्तानंद यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. दरम्यान, भारत सेवाश्रम संघाचे सरचिटणीस स्वामी विश्वात्मानंद यांनी मात्र या सर्व घटनाक्रमाची माहिती नसल्याचा दावा केला आहे.
काय आहे प्रकरण?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी आरामबाग लोकसभा मतदारसंघातील गोघाट येथील एका सभेत बोलताना, ‘‘रामकृष्ण मठ आणि भारत सेवाश्रम संघाचे काही संन्यासी हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहेत,’’ असा आरोप केला होता. त्यावरून वादंग निर्माण झाला. ममता यांच्या या आरोपानंतर पंतप्रधान मोदी यांनी देखील ममता यांच्यावर टीका केली. ‘‘ममता या ठराविक मतपेढीचे लांगूलचालन करण्यासाठी इस्कॉन, रामकृष्ण मठ आणि भारत सेवाश्रम संघासारख्या धार्मिक आणि सेवाभावी कार्य करणाऱ्या संस्थांबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत,’’ असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला होता.
ममतांची सारवासारव
बांकुरा : आपल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सारवासारव केली आहे. ‘‘मी रामकृष्ण मठ अथवा भारत सेवाश्रम बद्दल बोललेच नव्हते, राजकारण करणाऱ्या तेथील दोघा तिघा व्यक्तींवर मी बोलले होते,’’ असा दावा ममता यांनी बांकुरा येथील सभेत बोलताना केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.