Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभेतील वाढलेला टक्का कुणाला ठरणार फायदेशीर?

Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. मतदानाचा वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यांना की, विरोधकांना फायदेशीर ठरणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Karan Pawar, Smita Wagh
Karan Pawar, Smita Waghesakal

Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. मतदानाचा वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यांना की, विरोधकांना फायदेशीर ठरणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. विशेषत: शहरी भागातील मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. दुपारीही अनेक मतदान केंद्रांवर मोठमोठ्या रांगा दिसून आल्या. (voting percentage has increased in Jalgaon Lok Sabha constituency this year)

सायंकाळी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी दिसून आली. जळगाव लोकसभा मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान झाले. ते गेल्या पंचवार्षिकपेक्षा चार ते पाच टक्क्यांनी अधिक आहे. मतदारांच्या उत्साहाचाच हा परिणाम आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील मतदारसंघाची आकडेवारी पाहिल्यास त्या ठिकाणीही चांगले मतदान झाले.

सायंकाळी पाचपर्यंत जळगाव ग्रामीण मतदार संघात ५५.८५ टक्के, तर त्या खालोखाल एरंडोल मतदारसंघात ५५.७९ टक्के मतदान झाले. जळगाव शहरात ४९.५०, तर चाळीसगाव तालुक्यात ५०.३७ टक्के मतदान झाले. भडगाव-पाचोऱ्यात ५३.९०, तर अमळनेर तालुक्यात ४७.४० टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ ते ६ या एक तासातही मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने टक्केवारी ६० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तब्बल ५६ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजपचे उन्मेश पाटील तब्बल साडेचार लाखांच्या फरकाने विजयी झाले होते. मात्र, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. यंदा अशी काही लाट दिसून येत नसली, तरी नरेंद्र मोदी यांच्याच नावावर मतदान भाजपने मागितले. त्यामुळे हा ‘करिष्मा’ कायम ठरल्यास भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो. (latest political news)

Karan Pawar, Smita Wagh
Jalgaon Lok Sabha Constituency : संमिश्र कौलाचा इतिहास, आव्हान मताधिक्क्याचे

दुसरीकडे विरोधी शिवसेनेने भाजपचाच व्यक्ती फोडून त्यांना उमेदवारी दिली, तसेच विद्यमान खासदारही विरोधी पक्षात होते. याशिवाय जळगाव लोकसभा मतदारसंघातील तीन शिवसेनेचे आमदार फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभुतीही होती. त्यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का ठाकरे गटालाही फायदेशीर ठरू शकतो.

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप मित्रपक्ष महायुतीच्या स्मिता वाघ व शिवसेना (उबाठा), मित्रपक्ष महाविकास आघाडीचे करण पवार यांच्यात खरा सामना आहे. मतदारसंघानिहाय मतदान पाहिल्यास करण पवार यांच्या एरंडोल-पारोळा मतदारसंघात तब्बल ५५.७९ मतदान सायंकाळी सहापर्यंत झाले होते. भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या अमळनेर मतदारसंघात ४७.४० टक्के मतदान झाले होते.

ही आकडेवारी तशी निकाल ठरविणारी नाही व अंदाज दाखविणारी नाही. त्यामुळे मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील मतदानाचा विचार करावा लागणार आहे. मतदारांचा उत्साह आणि वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यांना घातक असतो, असे पारंपरिक गणितावरून म्हटले जाते. मात्र, अनेकवेळा हे पारंपरिक गणितही टिकली नसल्याचे दिसते.

त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का मतदानाच्या निकालाबाबत संभ्रम ठरविणारा निश्‍चित आहे. मतमोजणीस तब्बल २२ दिवस शिल्लक आहेत. तोपर्यंत आपल्याकडे कोणाला फायदा, कोणाला तोटा, ही चर्चा होणार आहे. ४ जूनला जनतेचा फैसला कळणार आहे. तोपर्यंत ‘कमळ’ की ‘मशाल’ यांच्या विजयाबाबत अंदाज सुरूच राहणार आहे.

Karan Pawar, Smita Wagh
Jalgaon Lok Sabha Constituency : भुसावळला महायुती, आघाडीचे फ्लेक्स युद्ध रंगले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com