न खाता-पिता 75 वर्षे जगलेले चुंदरीवाले बाबांचे निधन

prahlad jani chunari valaey baba who claim to live without food water in 75 years passes away at gujrat
prahlad jani chunari valaey baba who claim to live without food water in 75 years passes away at gujrat

अहमदाबाद (गुजरात): ऐंशी वर्षे अन्न-पाणी न घेतल्याचा दावा करणारे प्रल्हाद जानी उर्फ चुंदरीवाले यांचे आज (मंगळवार) निधन झाले. ते 90 वर्षांचे होते.

चुंदरीवाले हे विज्ञानासाठी एक कोडे ठरले होते. डीआरडीओने सुद्धा त्यांच्यावर संशोधन केले होते. ते खातात की नाही यासाठी त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱयाद्वारे लक्ष ठेवले जात होते. पण, काही खाताना अथवा सेवन करताना आढळून आले नव्हते.

प्रल्हाद जानी यांनी 75 वर्षे काहीच खाल्ले नव्हते किंवा पाण्याच्या थेंबालाही स्पर्शही केला नव्हता. त्यांचे शरीर हे विज्ञानासाठी एक कोडे होते ते कधीच सुटले नाही. एखादा माणूस न खाता पिता, मलमूत्र विसर्जन न करता कसा काय जिवंत राहू शकतो असा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडला. तेव्हा अहमदाबादच्या काही डॉक्टरांनी त्यांना 15 दिवस 24 तास निगराणी खाली ठेवले. जानी यांनी 15 दिवस पाण्याचा थेंबही घेतला नव्हता. संशोधक आणि शास्त्रज्ञांनी याचा खूप शोध घेतला. याचा जर शोध लागला तर अंतराळात जाणारे, दुर्गम ठिकाणी जाणारे आणि देशाच्या सीमेवर तैनात असणार्‍या जवानांसाठी याचा खूप फायदा झाला असता. परंतू, खूप संशोधन करून याचे उत्तर मिळाले नाही आणि त्यांच्या शरीराचे रहस्य त्यांच्यासोबत गेले.

प्रल्हाद जानी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1929 रोजी झाला होता. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी गाव सोडले होते. गेल्या 50 वर्षांपासून ते अहमदाबादपासून 180 किमी दूर असलेल्या बनासकांठा येथे डोंगरावर असलेल्या अंबाजी मंदिराच्या गुहेत राहात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com