'कोरोना तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है...'

 china wuhan lab shi zhengli statement on corona virus
china wuhan lab shi zhengli statement on corona virus

बिजींग: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनानेच हाहाकार उडवून दिला असताना, 'कोरोना तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है', असे विधान चीनमध्ये वटवाघूळ यांच्यावर संशोधन करणाऱ्या शी झेंगली या महिला व्हायरॉलॉजिस्टने केले असून, खळबळ उडाली आहे.

चीनच्या वुहान प्रांतात असलेल्या लॅबमधून पसरलेल्या कोरोनाने जगभरात हाहाकार उडवून दिला आहे. आजपर्यंत 56 लाख नागरिकांना या प्राणघातक व्हायरसची लागण झाली असून, साडे तीन लाख लोकांनी जीव गमावला आहे. अमेरिका, रशिया, स्पेन, फ्रान्स सारख्या देशांना मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे आर्थिक नियोजन बिघडले असून, अनेकांना रोजगार गमवावा लागला आहे.

'बॅट वूमन' या नावाने जगभरात विख्यात असणाऱ्या शी झेंगली चीनमधील 'वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी'च्या डेप्युटी डायरेक्टर आहेत. त्या म्हणाल्या, 'वटवाघूळासारख्या जंगली जनावरांत कोरोना सारखे जीवघेणे व्हायरस असतात. वेळीच त्याचा शोध घेता आला नाही तर येणाऱ्या काळात जगाला कोरोना सारख्या किंवा त्यापेक्षा अधिक धोकादायक महामारीचा सामना करावा लागू शकतो. कोरोना तर फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है.'

शी झेंगली पुढे म्हणाल्या, व्हायरसवर होत असलेल्या संशोधनाबाबत सरकार आणि शास्रज्ञ यांच्यात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. चीनवर सध्या कोरोना बाबत जगाला उशिरा माहिती दिल्याचा आरोप होत आहे. पण, हे  'विज्ञानवादी राजकारण' आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com