Prajwal Revanna Case : हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशी संबंधित प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या बंगळूरमधील विशेष न्यायालयानं (Bengaluru Special Court) हा निर्णय दिला. उद्या (२ ऑगस्ट) न्यायालय शिक्षेचा कालावधी जाहीर करणार आहे.