Prajwal Revanna,
esakal
लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी खासदार प्रज्वल रेवन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा सेंट्रल जेलमध्ये त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइल फोन आणि पेन ड्राइव्हच्या फॉरेंसिक तपासणीत १४५ हून अधिक व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अश्लील व्हिडीओबरोबरच OTTवरील मालिका आणि चित्रपटांचाही समावेश आहे.