बंगळूर : हासनचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) बलात्कार प्रकरणात दोषी ठरून सध्या बंगळूर मध्यवर्ती कारागृहात (Bangalore Central Jail) शिक्षा भोगत आहे. एकेकाळी १.२ लाख रुपये मासिक पगार घेणाऱ्या रेवण्णाची आता तुरुंगात नवी ओळख ‘कैदी क्रमांक १५५२८’ अशी झाली आहे. कारागृह नियमांनुसार, त्याला आठवड्यातून सहा दिवस ८ तास काम केल्यास जास्तीत जास्त ५४० रुपये मासिक मजुरी मिळणार आहे.