Prakash Javadekar : लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला कर्नाटकात चांगले यश मिळेल - प्रकाश जावडेकर

जेडीएसच्या कमी झालेल्या पाच ते सहा टक्‍क्‍यांचा फायदा कॉंग्रेसला
Prakash Javadekar statement BJP will get success in Karnataka in Lok Sabha elections politics
Prakash Javadekar statement BJP will get success in Karnataka in Lok Sabha elections politicssakal

पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या मतांना धक्का बसलेला नाही. जेडीएसच्या कमी झालेल्या पाच ते सहा टक्‍क्‍यांचा फायदा कॉंग्रेसला झाला, त्यामध्ये त्यांना लॉटरी लागली. लोकसभा निवडणुकीला भाजपला पुर्वीप्रमाणेच चांगल्या जागा मिळतील, त्यावेळी चित्र नक्कीच वेगळे असेल, असे खासदार प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

स्मार्ट पुणे फाऊंडेशनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सेवा सुशासन व जनकल्याणाच्या 9 वर्ष पुर्तीनिमित्त "खासदार चषक' या भव्य पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबाबतची माहिती जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, संयोजक डॉ.संदीप बुटाला उपस्थित होते.

Prakash Javadekar statement BJP will get success in Karnataka in Lok Sabha elections politics
Karnataka Election : विधानसभेत दिसणार 'पाटीलकी'; निवडणुकीत तब्बल 'इतक्या' पाटलांनी मिळवला विजय

जावडेकर म्हणाले, ""कर्नाटक निवडणुकीमध्ये जेडीएसची मते 5 ते 6 टक्‍क्‍यांनी कमी झाली, त्यामध्ये त्यांच्या जादा सीट निवडून येणार, फायदा कॉंग्रेसला झाला. बाकी भाजपच्या मतांवर कुठलाही परिणाम झालेला नाही. भाजपची पुर्वी होती तितकीच मते यावेळीही कायम आहेत. प्रत्येक निवडणुक वेगळी असते, राज्यानुसार तिचे चित्र बदलत असते. देशात 1999 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्या होत्या.

Prakash Javadekar statement BJP will get success in Karnataka in Lok Sabha elections politics
Karnataka CM Oath Ceremony : कर्नाटकच्या नवनियुक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा 'या' दिवशी थपथविधी

त्यावेळी आम्हाला लोकसभेला 40 टक्के, तर विधानसभेला 30 टक्के इतके मतदान झाले होते. विधानसभा व लोकसभा या दोन्ही निवडणुकांबाबत मतदारांची मते वेगवेगळी असतात. कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल.'' कसब्यात दरवेळी तिरंगी लढत झाली, तेव्हा आमचा विजय झालेला आहे, कसब्यात पहिल्यांदाच दोघांमध्ये सरळ लढत झाली होती, असे सांगत जावडेकर यांनी पुणे लोकसभा निवडणुकीवर थेट भाष्य करण्याचे टाळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com