
हे तर कुचकामी आघाडी सरकार : जावडेकर
नवी दिल्ली : महाराष्ट्रात महाविश्वासघातकी आघाडी सरकार आहे व लोकच असे सरकार बाजूला करतील, असे भाकीत ज्येष्ठ भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज वर्तविले. इतके संधीसाधू, कुचकामी, अनैतिक व जनविरोधी सरकार महाराष्ट्राने आजतागायत पाहिलेले नाही असेही ते म्हणाले.
जावडेकर यांनी दिल्लीत राष्ट्रीय माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर हल्ला चढविला. ते म्हणाले, की राज्यातील सरकारला पेट्रोलपेक्षा विदेशी दारू स्वस्त करणे महत्वाचे वाटते. राज्याचे मुख्यमंत्री अदृश्य आहेत. त्यांनी निवडणुकीत आपली खरी संपत्ती दडविल्याचे प्रकरण निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे.
हेही वाचा: दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; महापालिका सतर्क
राज्याचे गृहमंत्रीच ६ महिने फरार राहातात व नंतर तुरूंगात जातात, असे देशात अन्य कोणतेही राज्य नसेल.मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचा बंगला गैरमार्गाने गैरमार्गाने बांधल्याचे उघड झाले. दुसऱ्या मंत्र्यांनीही सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून आलिशान रेस्ट हाऊस बांधले. असे कित्येक मंत्री आहेत.
महाराष्ट्रात यापूर्वी इतके भ्रष्ट, निष्क्रिय, अनैतिक सरकार झाले नाही. दोन वर्षांचा यांचा कारभार पाहून लोकांनी या सरकारला महावसुली आघाडी असे म्हटले. ही महाविश्वासघातकी आघाडी आहे कारण जनतेचा त्यांनी विश्वासघात केला. राज्यात कुशासन आहे.
- प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ भाजप नेते
Web Title: Prakash Javdekar Mahavikas Aghadi Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..