Goa : प्रमोद सावंतांना महत्त्वाचं खातं, तर राणेंना काय मिळालं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pramod Sawant and Vishwajit Rane

Goa : प्रमोद सावंतांना महत्त्वाचं खातं, तर राणेंना काय मिळालं?

भाजपने गोव्यात दणदणीत विजय संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची नियुक्ती केली. यानंतर खातेवाटपाची सर्वांना प्रतीक्षा लागली होती. उशीर होत असलेल्या अनेक उलट-सुलट चर्चाही रंगत होत्या. अखेर गोवा मंत्रिमंडळाचे बहुप्रतीक्षित खातेवाटप आज जाहीर झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याकडे गृह व अर्थची जबाबदारी देण्यात आली. तर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असलेले विश्वजित राणे (Vishwajit Rane) कोणते खाते मिळाले हे पाहुयात...

२८ मार्च रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या सर्वांना रविवारी खातेवाटप करण्यात आले. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना कृषी, नागरी पुरवठा व हस्तकला विभागाची जबाबदारी दिली. माविण गुदिन्हो यांच्याकडे वाहतूक, उद्योग, पंचायत, शिष्टाचार व संसदीय व्यवहार खाते सोपवण्यात आले.

हेही वाचा: ‘कोरोनाच्या करात ४१८ अब्ज डॉलरची विक्रमी निर्यात’

पर्यावरण खाते पुन्हा एकदा नीलेश काब्राल यांना देण्यात आले आहे. सोबत संसदीय व्यवहार, सार्वजनिक बांधकाम, कायदा व न्याय्य ही खाती देण्यात आली आहेत. सुभाष शिरोडकर यांच्याकडे सहकार, जलस्रोत विकास व प्रोव्हेदोरिया खाते दिले गेले आहेत. तर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असलेले विश्वजित राणे यांना आरोग्य, नगरविकास व नगरनियोजन, महिला व बाल कल्याण आणि वने खाते देण्यात आले आहे.

प्रमोद सावंतांची खेळी

गोव्याचे (Goa) खातेवाटप जाहीर (Allocation of portfolios) करताना डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मोठी खेळी खेळली. प्रमोद सावंत यांनी स्वत:कडे गृह आणि वित्त खाते ठेवले. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असलेले विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांना आरोग्य खात्यासह, नगरविकास व नगरनियोजन, महिला व बाल कल्याण आणि वने ही खाती दिली आहेत. मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांचा पराभव करणाऱ्या बाबूश मोन्सेरात यांच्याकडे महसूल, कामगार, कचरा व्यवस्थापन ही खाती देण्यात आली आहेत.

Web Title: Pramod Sawant Vishwajit Rane Goa Account Sharing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :GoaPramod sawant
go to top