राष्ट्रपती पदी आल्यानंतर काँग्रेसची दिशा भटकली; प्रणब मुखर्जी यांनी आत्मकथनात केला खुलासा

pranab mukharji
pranab mukharji

नवी दिल्ली : भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आपल्या आत्मकथेत लिहलंय की, त्यांच्या राष्ट्रपती पदावरील नियुक्तीनंतर काँग्रेस आपल्या दिशेपासून भटकली. काही पक्ष सदस्यांचं असं म्हणणं आहे की, जर 2004 मध्ये जर ते पंतप्रधान बनले असते तर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला इतका लाजीरवाणा पराभव पहायला लागला नसता. मुखर्जी यांनी आपल्या निधनाआधीच आपली आत्मकथा 'द प्रेसिडेंशियल इअर्स' या नावाने लिहली होती. रुपा प्रकाशनाद्वारे प्रकाशित होणारे हे पुस्तक 2021 च्या जानेवारी महिन्यात वाचकांसाठी उपलब्ध होईल.  

प्रणब मुखर्जी यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच इतर अनेक व्याधींमुळे त्यांचा गेल्या 31 जुलै रोजी वयाच्या 84 व्या वर्षी मृत्यू झाला. सध्या काँग्रेस एका उलथापलथीतून जात असतानाच प्रणब मुखर्जी यांचं हे पुस्तक प्रकाशित होणं महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. या पुस्तकात मुखर्जी लिहतात की, काही पक्ष सदस्यांचं असं म्हणणं होतं की, जर 2004 मध्ये ते पंतप्रधान बनले असते 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची अशी दयनीय अवस्था झाली नसती. मात्र, मी या मताशी सहमत नाहीये. मात्र, मी असं मानतो की, मी राष्ट्रपती बनल्यानंतर पक्षाने राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्षाच्या प्रकरणांना हाताळायला असमर्थ होत्या. तसेच मनमोहन सिंह यांच्या सदनामधील मोठ्या अनुपस्थितीमुळे खासदारांसोबत कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीगत संपर्क पूर्णपणेच थांबला.

माजी राष्ट्रपती पुढे लिहतात की, मला असे वाटते की राज्य करण्याचा नैतिक अधिकार पंतप्रधानांकडे आहे. देशाची संपूर्ण शासन व्यवस्था पंतप्रधान आणि त्यांच्या कारभाराचे प्रतिबिंब असते. डॉ. मनमोहन सिंह हे युती वाचवण्याबाबत नेहमी प्रयत्नशील होते, ज्याचा कारभारावर परिणाम झाला तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात एकुलतावादी शासन पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे दिसून आले जे सरकार, विधिमंडळ आणि न्यायपालिका यांच्यातील घट्ट संबंधांमुळे दिसून येते. या पुस्तकात पश्चिम बंगालच्या एका गावात आपलं बालपण अनुभवल्यापासून ते राष्ट्रपती बनल्यानंतरच्या मोठ्या प्रवासाबाबत त्यांनी प्रकाश टाकला आहे. रुपा प्रकाशनने शुक्रवारी या पुस्तकाची घोषणा केली. प्रणब मुखर्जी यांचं हे आत्मचरित्र 'द प्रेसिंडेंशियल इअर्स' जानेवारी 2021 मध्ये जागतिक पातळीवर प्रकाशित केलं जाईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com