प्रणव मुखर्जी यांची स्थिती 'हीमोडायनेमिकली स्टेबल'; आर्मी हॉस्पिटलने दिली माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 28 August 2020

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.

नवी दिल्ली- देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रणव मुखर्जी खोल कोमामध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ ऑक्सिजन सपोर्टवर (ventilator support) ठेवण्यात आले आहे. आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलने एक बुलेटीन जाहीर करुन सांगितलं की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी गेल्या 17 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. ब्रेन सर्जरीनंतर ते गंभीर स्थितीतून जात आहेत.  

आर्मी रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसांमध्ये संक्रमण झाले आहे, त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की, प्रणव मुखर्जी यांच्या मूत्रपिंडाची स्थितीही मंगळवारपासून ठिक नाही. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची स्थिती 'हीमोडायनेमिकली स्टेबल' बनली आहे. याचा अर्थ प्रणव मुखर्जी यांचे ह्रदय योग्य प्रकारे काम करत आहे आणि शरीराचे रक्ताभीसरण सामान्य आहे. 

आंतराष्ट्रीय बाजारात सोने उतरले; भारतातील दरही कमी होणार

गेल्या आठवड्यात प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसांमध्ये संक्रमण झाले होते, त्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. प्रणव मुखर्जी 10 ऑगस्ट रोजी सर्जरी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तेव्हापासूनच त्यांच्या तब्येत कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pranab Mukherjee haemodynamically stable said Army Hospital Delhi Cantonment