Pranab Mukherjee Health Updates: ऑपरेशनपूर्वी प्रणव मुखर्जींनी व्यक्त केली होती फणस खाण्याची इच्छा

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 14 August 2020

वडीलांनी सांगितल्यानंतर अभिजीत मुखर्जी त्यांचे मुळ गाव 'मिराती'ला गेले. तिथून ते जवळपास 25 किलोंचा एक फणस घेऊन 3 ऑगस्टला दिल्लीला आले होते.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची (Pranab Mukherjee) तब्येत खुपच खराब झाली असून  सध्या ते कोमात आहेत. वेंटिलेटरवर ठेवण्याअगोदर त्यांनी काही दिवसांपुर्वी मुलगा अभिजीत मुखर्जींना (Abhijit Mukherjee) फोन केला होता. त्यावेळेस त्यांनी गावाकडील खूप आठवण येत असून फणस (jackfruit)खाण्याचीही इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी फोनवर बोलताना 'कटहल नीये आये'(मला फणस आणून दे) असं म्हंटलं होतं. 

independence day 2020 : मर्यादित पाहुणे; PPE किटमध्ये दिसतील जवान... जाणून घ्या कसा असेल लाल किल्ल्यावरील नजारा

अभिजीत मुखर्जी हे कॉंग्रेस नेते असून ते सध्या पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये राहतात. वडीलांनी सांगितल्यानंतर अभिजीत मुखर्जी त्यांचे मुळ गाव 'मिराती'ला गेले. तिथून ते जवळपास 25 किलोंचा एक फणस घेऊन 3 ऑगस्टला दिल्लीला आले होते. दिल्लीत नंतर त्यांनी वडीलांसोबत काही क्षण घालवले. त्याबद्दल ते बोलताना म्हणाले की, "मी भेटलो त्यावेळेस त्यांनी थोडं फणस खाल्लं त्याक्षणी ते आनंदी दिसत होते आणि आजारीही नव्हते. तसेच त्यांची शूगरही ठीक होती. पण अचानक काही ते दिवसांनी आजारी पडले." 

सीमावादावरून भारताकडून गुंतागुंत वाढू नये

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे त्यांची त्याची शस्त्रक्रिया झाली. तसेच त्यांचा कोरोनाचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. यामुळे त्यांची तब्येत अजुनच बिघडली होती. यापुर्वी मा. मुखर्जीं भारताचे संरक्षण मंत्रीही राहीले असल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुबीयांनी दिल्ली मधील 'आर्मी रिसर्च अ‍ॅण्ड रेफरल हॉस्पीटल'मध्ये दाखल केलं होतं. अभिजीत मुखर्जींना रुग्णालयात प्रणवजींना आतापर्यंत फक्त 4 वेळाच भेटता आलं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यापूर्वी प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून एक भावनिक पोस्ट केल्याचे पाहायला मिळाले होते. मागील वर्षीचा 8 ऑगस्ट  हा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. या दिवशी वडिलांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज एक वर्षानंतर 10 ऑगस्ट रोजी ते गंभीर स्वरुपाच्या आजाराचा सामना करत आहेत. हा क्षण माझ्यासाठी खूपच भावनिक असून या परिस्थितीचा सामना करण्यासाठी इश्वर शक्ती देईल, अशा आशयाचे ट्विट केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pranab Mukherjee Health Updates dad asked jackfruit from village son abhijit mukherjee emotional statment