प्रणव मुखर्जी म्हणतात, लोकसभेची सदस्यसंख्या एक हजार करा

पीटीआय
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

हमी काय?
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या मुद्द्यावरही मुखर्जी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेण्याचा मुद्दा अनेकदा आग्रहाने मांडला आहे. घटनात्मक दुरुस्तीद्वारे हा बदल करता येऊ शकतो. परंतु, निवडून आलेले सदस्य सरकारवर अविश्‍वास दाखविणारच नाहीत, याची हमी कोणालाही देता येणार नाही, त्यामुळे हा पर्याय व्यवहार्य नाही.’

नवी दिल्ली - ‘लोकसभेतील सदस्यसंख्या ५४३ वरून एक हजार करण्यात यावी, त्याच प्रमाणात राज्यसभेतील सदस्यांची संख्याही वाढवावी,’’ असे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंडिया फाउंडेशनने आयोजित अटलबिहारी वाजपेयी स्मृती व्याख्यानात मुखर्जी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘लोकशाहीत स्थिर सरकार देण्यासाठी बहुमत मिळते,

बहुसंख्याकवादासाठी बहुमत मिळत नसते. राजकीय पक्षांनी बहुसंख्यवादी होऊ नये म्हणूनच पूर्ण बहुमत मिळत नाही. हाच संसदीय लोकशाहीचा संदेश असून, लोकशाहीचा आत्माही आहे.’’

पाणी योजनांबाबत सुप्रिया सुळे काय म्हणतात पहा

‘लोकप्रतिनिधींचा मतदारसंघ खूप मोठा असतो, त्यामुळे एवढा मोठा मतदारसंघ सांभाळणे लोकप्रतिनिधींच्या आवाक्‍याबाहेरचे असते. त्यामुळेच लोकसभेच्या मतदारसंघांची संख्या वाढवणे हा त्यावरचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे लोकसभेच्या मतदारसंघांची संख्या एक हजारपर्यंत वाढविण्यात यावी. यापूर्वी १९७७ मध्ये लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. १९७१च्या जनगणनेच्या आधारे १९७७ मध्ये लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवण्यात आली होती, त्या वेळी देशाची लोकसंख्या ५५ कोटी होती. आता देशाची लोकसंख्या दुप्पट झाली आहे, त्यामुळे मतदारसंघांची फेररचना होणे गरजेचे आहे,’’ असे मुखर्जी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pranab Mukherjee says the Lok Sabha has a membership of one thousand