पंतप्रधानपदासाठी प्रणवजी माझ्यापेक्षा होते योग्य: मनमोहनसिंग

वृत्तसंस्था
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

त्यावेळी पंतप्रधान होण्याशिवाय माझ्यासमोर कोणताही पर्याय नव्हता. याबाबतचा प्रणव मुखर्जी यांनाही माहिती होती. पण, माझ्यामते प्रणव मुखर्जी त्यावेळी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार होते. मी राजकारणात अपघाताने आलो होते. तर, प्रणवजी आपल्या इच्छेनुसार आले होते. 2004 मध्ये ज्यावेळी सोनियाजींनी मला पंतप्रधान बनविण्याचे ठरविले.

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे 20004 मध्ये पंतप्रधानपदासाठी माझ्यासाठी योग्य उमेदवार होते, असे मत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केले.

प्रणव मुखर्जी यांच्या "द कोएलिशन इयर्स 1996-2012' या आत्मचरित्राचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी मनमोहनसिंग यांनी हे वक्तव्य करून सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला. या कार्यक्रमात प्रसारमाध्यांशी बोलताना सोनिया गांधी यांनी राहुल गांधी लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष होतील असे सुतोवाच केले.

मनमोहनसिंग म्हणाले, की त्यावेळी पंतप्रधान होण्याशिवाय माझ्यासमोर कोणताही पर्याय नव्हता. याबाबतचा प्रणव मुखर्जी यांनाही माहिती होती. पण, माझ्यामते प्रणव मुखर्जी त्यावेळी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार होते. मी राजकारणात अपघाताने आलो होते. तर, प्रणवजी आपल्या इच्छेनुसार आले होते. 2004 मध्ये ज्यावेळी सोनियाजींनी मला पंतप्रधान बनविण्याचे ठरविले. त्यावेळी प्रणवजी अधिक योग्य असल्याची मला जाणीव होती. प्रणवजी तेव्हा पंतप्रधान होण्याचा विचार करत असतील तर ते योग्यच होते. प्रणवजींनी मला प्रत्येकवेळी मदत केली. 

Web Title: Pranab Mukherjee was more qualified to become Prime Minister: Manmohan Singh