प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारुन दिला होता आश्चर्याचा धक्का!

pranav mukharjee at rss festival.jpg
pranav mukharjee at rss festival.jpg

नवी दिल्ली- माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दिल्लीच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये निधन झाले. याची माहिती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करुन दिली. मुखर्जी यांच्यावर ब्रेन सर्जरी झाली होती. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून ते रुग्णालयात होते. सोमवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यातच त्यांचे निधन झाले.

प्रणव मुखर्जी हे देशाचे तेरावे राष्ट्रपती होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेले प्रणव मुखर्जी ४७ वर्षांपर्यत काँग्रेससोबत जोडले गेले होते. २५ जूलै २०१२ रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ २०१७ पर्यंत राहिला. त्यांना २०१९ मध्ये भारतरत्न या देशातील सर्वोच्च पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

बंडखोर प्रणवदा : काँग्रेसला राम राम करून काढला होता पक्ष

जेव्हा आरएसएसच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून गेले होते प्रणवदा

२०१८ मध्ये प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम 'संघ शिक्षा वर्ग तृतीय'मध्ये मुख्य अतिथी म्हणून नागपूरात गेले होते. संघाच्या कार्यक्रमाला जाण्याच्या प्रणव मुखर्जींच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. काँग्रेस नेतेही त्यांच्या या निर्णयाने आश्चर्यचकित झाले होते. मात्र, अनेक काँग्रेस नेत्यांनी उघडपणे याबाबत काही विरोधाची प्रतिक्रिया देणे टाळलं होतं.

काँग्रेस नेत्याने केला होता विरोध

काँग्रेस नेते संदिप दिक्षित यांनी याप्रकरणी जोरदार विरोध केला होता. प्रणव मुखर्जी यांनी यापूर्वी जातीयवाद आणि हिंसेसाठी संघाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनीच संघाला राष्ट्रविरोधी म्हटलं होतं आणि याला देशामध्ये काही थारा नसायला हवा असंही ते म्हणाले होते. मुखर्जी संघाला सापापेक्षाही विषारी म्हणत होते. मग आता ते संघाच्या कार्यक्रमाला का जात आहेत? प्रणव मुखर्जी यांनी आपवी विचारधारा बदलली आहे का? का संघातच आता कोणता स्वाभिमान राहिला नाही? असे काही प्रश्न दिक्षित यांनी उपस्थित केले होते.

काँग्रेसच्या संदिप दिक्षित यांच्या विषारी टीकेनंतर भाजपनेही पलटवार केला होता. भाजपचे वरिष्ठ नेता नितिन गडकरी यांनी काँग्रेसला सडेतोड उत्तर दिलं होतं. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ पाकिस्तानची संघटना आहे का? असा सवाल त्यांनी केला होता. गडकरी उदाहरण देताना म्हणाले होते की, लोक दारुच्या दुकानात जातात, डान्स बारमध्ये जातात, प्रणव मुखर्जी तर केवळ संघाच्या कार्यक्रमाला येत आहेत.

(edited by-kartik pujari)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com