'राफेल प्रकरणामुळेच सीबीआयमधील नाट्य'

'राफेल प्रकरणामुळेच सीबीआयमधील नाट्य'

नवी दिल्ली : राफेल करारातील गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या अडचणी वाढल्याने केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) नाट्य घडविण्यात आल्याचा आरोप, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केला आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही भूषण यांनी म्हटले आहे.

सीबीआय उच्चपदस्थांमध्ये उफाळलेला संघर्ष मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलेला असताना आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवून केंद्राने एम. नागेश्वर राव यांची सीबीआयच्या प्रभारी संचालकपदी नेमणूक करून त्यांच्या हातात सगळी सूत्रे दिली होती. यापैकी वर्मा यांना चुकीच्या पद्धतीने पदावरुन हटवल्याचा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. राकेश अस्थाना या वादग्रस्त अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू असून याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे भूषण यांनी सांगितले. 

राफेल करारामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी सीबीआयकडे करण्यात आली होती. त्यावेळी माझ्यासोबत अरुण शौरी आणि यशवंत सिन्हाही होते. ती चौकशी पूर्ण होऊ नये, यासाठी सीबीआयमध्ये हालचाली घडवल्या जात आहेत. संचालक आलोक वर्मा यांना पदावरुन हटवण्याची कारवाई याच हालचालींचा एक भाग असल्याचा गंभीर आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. राकेश अस्थाना यांना वाचवण्यासाठी सरकारचा खटाटोप सुरू आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com