रोजगार, विकास मुद्द्यांवर धनशक्तीचा विजय; प्रशांत भूषण यांची भाजपवर टीका

भाजपच्या सरकारांनी संस्था, लोकशाही आणि सभ्यतेचा मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
Prashant Bhushan And BJP
Prashant Bhushan And BJPesakal

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी (ता.दहा) लागला आहे. यात चार राज्यांमध्ये भाजपने पुन्हा सत्ता मिळविले आहे. या विजयाचा भाजपकडून देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षाने (Aam Aadami Party) दणदणीत विजय मिळविला आहे. दुसरीकडे काँग्रेसचा (Congress Party) मोठा पराभव या राज्यात झाला आहे. भाजपच्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यातील विधानसभा निवडणुकांमधील विजयावर प्रसिद्ध विधिज्ञ प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनी आज शुक्रवारी (ता.११) ट्विट करुन टीका केली आहे. भूषण म्हणतात, विधानसभांचा निकाल आमच्यापैकी बऱ्याच जणांसाठी धक्कादायक वाटतो. (Prashant Bhushan Criticize BJP Over Assembly Elections2022 Victory)

Prashant Bhushan And BJP
Akhilesh Yadav | अखिलेश यादवांचा दमदार विजय,भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला हरवले

भाजपच्या (BJP) सरकारांनी संस्था, लोकशाही आणि सभ्यतेचा मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. धनशक्ती आणि प्रचारतंत्राने रोजगार, विकास आणि आरोग्य आदी मुद्द्यांवर विजय मिळविला आहे. आपल्याला प्रजासत्ताकासाठी मेहनतीने काम करण्याची गरज आहे, असे आवाहन प्रशांत भूषण यांनी लोकांना केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com