प्रशांत भूषण १ रुपयाचा दंड भरणार? ट्विट करुन दिलाय संकेत

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 31 August 2020

सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षेची घोषणा होताच वकील राजीव धवन यांनी प्रशांत भूषण prashant bhushan यांना १ रुपया दिला आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षेची घोषणा होताच वकील राजीव धवन यांनी प्रशांत भूषण prashant bhushan यांना १ रुपया दिला आहे. भूषण यांच्या हातात एक रुपयांचे नाणे ठेवताणाचे धवन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रशांत भूषण यांनीही दोन फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये राजीन धवन भूषण यांना एक रुपयाचे नाणे देत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये भूषण आपल्या हातातील एक रुपयाचे नाणे दाखवत आहेत. त्यांनी हे फोटो शेअर केल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. 

1 रुपयाचा दंड भरा किंवा वकीली सोडा; प्रशांत भूषण यांना न्यायालयाने सुनावली...

ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी फोटो ट्विट करत काही मजकूर लिहिला आहे. 'माझे वकील आणि वरिष्ठ मित्र राजीव धवन यांनी आज अवमान प्रकरणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मला एक रुपया दिला आहे, जे मी कृतज्ञता पूर्वक स्वीकारत आहे', असं भूषण आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी शेअर केलेले फोटो आणि हे वक्तव्य यावरुन नेमका काय अर्थ निघतो? प्रशांत भूषण यांनी न्यायालयाच्या अवमान प्रकरणी (Contempt of Court Case)  दंड भरण्याची तयारी केली आहे का?

प्रशांत भूषण न्यायालयाच्या शिक्षेनंतर काय निर्णय घेतील, यावर कोणतेही वक्तव्य करणे केवळ अंदाज ठरेल. पण प्रशांत भूषण यांनी ट्विटमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी १ रुपयाचा दंड भरण्याची शिक्षा स्वीकारली असल्याचे संकेत मिळत आहेत. याचमुळे धवन यांनी भूषण यांना १ रुपयाचे नाणे दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार संधी देऊनही प्रशांत भूषण यांनी आपली चूक मान्य केली नव्हती. मात्र, भूषण यांनी आपल्या वकीलाने दिलेली १ रुपयाची राशी स्वीकारुन त्यांचा सन्मान करताना दिसत आहेत.

विजय मल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; अवमान प्रकरणातील याचिका फेटाळली

प्रशांत भूषण यांना दोन ट्विट करुन सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. त्यांना न्यायालयाने १ रुपयाचा दंड ठोठावला आहे. भूषण यांना १५ सप्टेंबरपर्यंत दंड भरण्याची मुदत देण्यात आली आहे. भूषण यांनी हा दंड न भरल्यास त्यांना 3 महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो आणि त्यांच्या 3 वर्षे वकीली करण्यावरही बंदी येऊ शकते. त्यामुळे भूषण १ रुपयाचा दंड भरतात की तीन महिन्याचा तुरुंगवास आणि तीन वर्ष वकीली न करण्याचा निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, प्रशांत भूषण यांच्या आज ४ वाजताच्या पत्रकार परिषदेकडे सर्व देशाचे लक्ष असणार आहे.

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: is prashant bhushan going to accept 1 rs fine for contempt of court