बिनशर्त माफी मागण्यास प्रशांत भूषण यांचा नकार; 'मी माफी मागितली तर...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant_Bhushan

प्रशांत भूषण यांनी आपल्या वादग्रस्त ट्विटबद्दल सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला. त्यांनी अवमान प्रकरणी आपले म्हणणे पुन्हा सादर केले.

बिनशर्त माफी मागण्यास प्रशांत भूषण यांचा नकार; 'मी माफी मागितली तर...'

नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला आहे. माझी वक्तव्ये ही सद्भावनापूर्ण होती आणि जर मी माफी मागितली, तर माझ्या स्वाभिमान आणि ज्या व्यवस्थेवर सर्वाधिक विश्वास आहे, त्या व्यवस्थेचा अपमान होईल, असे भूषण यांनी म्हटले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, २० ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण अवमान प्रकरणी शिक्षेवरील सुनावणी तहकूब केली होती. कोर्टाने त्यांना लेखी निवेदनावर पुनर्विचार करण्यास सांगून त्यांना दोन दिवसांची मुदत दिली आहे.

राहुल गांधींवर आरोप करणारे ट्विट घेतले मागे; कपिल सिब्बल यांचा खुलासा

दरम्यान, प्रशांत भूषण यांनी आपल्या वादग्रस्त ट्विटबद्दल सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला. त्यांनी अवमान प्रकरणी आपले म्हणणे पुन्हा सादर केले. मात्र, सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच निकाल राखून ठेवला आहे. कोर्टाने भूषण यांना सोमवार (ता.२४) पर्यंत बिनशर्त माफी मागण्याची संधी दिली होती. 

प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात म्हटले आहे की, 'माझे ट्वीट सद्भावनापूर्वक होते आणि त्यावर मी कायम राहणार आहे. मी उपस्थित केलेल्या विधानांवर कोर्टाला उत्तरे देता आली नाहीत. माझं मत आहे की, जर मी माफी मागितली, तर तो माझ्या स्वाभिमानाचा अवमान होईल, आणि ज्या व्यवस्थेचा मी आदर करतो तिचाही अपमान होईल. 

४५ वर्षांच्या गुलामीचं हेच फळ का? ओवैसींचा गुलाम नबी आझादांवर निशाणा

भूषण पुढे म्हणाले, 'माझ्या मनात सुप्रीम कोर्टाबद्दल सर्वात जास्त आदर आहे. सुप्रीम कोर्ट किंवा कोणत्याही सरन्यायाधीशाची बदनामी करण्यासाठी मी हे ट्विट केले नाही, उलट ते माझे कर्तव्य आहे. माझी टीका ही रचनात्मक, घटनेचे रक्षण होईल आणि लोकांच्या अधिकाराला पूरक अशी आहे. तसेच ती सुप्रीम कोर्ट व्यवस्थेची दिशाभूल होण्यापासून रोखण्यासाठीही आहे.'
न्यायव्यवस्था आणि सरन्यायाधीशांविरोधात केलेल्या दोन ट्विटबद्दल सुप्रीम कोर्टाने भूषण यांना दोषी ठरवले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top