Prashant Kishor Slams Raj Thackeray Over Chhath Puja Row
esakal
छठपूजेवरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपूजेची गाणी आणि भोजपुरी गाणी वाजवण्याला विरोध केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरे यांच्यासारख्या लोकांना विनाकारण महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला आहे. तसेच सहा महिने कोणी विचारत नाही, तेव्हा राज ठाकरे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांविरोधात बोलू लागतात, असा आरोपही प्रशांत किशोर यांनी केला.