The Strategist's Faltering Debut

The Strategist's Faltering Debut

Sakal

Bihar Election : '१५० जागांचा दावा' सपशेल फोल! देशातील यशस्वी रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या 'जनसुराज'च्या हाती बिहारमध्ये 'शून्य' जागा

The Strategist's Faltering Debut : पंतप्रधान मोदींसह अनेक पक्षांसाठी यशस्वी रणनीती आखणारे प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत २३८ जागा लढवूनही 'जनसुराज' पक्षाच्या हाती शून्य जागा आल्याने त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले असून, १५० हून अधिक जागा जिंकून सत्तेत येण्याचे त्यांचे मोठे दावे सपशेल चुकले आहेत.
Published on

Jan Suraj Fails to Open Account : पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देशातील सर्व राष्ट्रीय पक्ष आणि आघाडीच्या प्रादेशिक पक्षांची प्रचार रणनीती आखून ती यशस्वीपणे अमलात आणणारे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत घेतलेली उडी निष्फळ ठरली. गाजावाजा करीत २३८ जागा लढविणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या ‘जनसुराज’च्या हाती शून्य आले. बिहारमध्ये १४ नोव्हेंबर रोजी दीडशेपेक्षा जास्त जागा जिंकूुन सत्तेत येत जनसुराज पक्ष इतिहास घडवेल, असे किशोर म्हणाले होते. जनसुराजने इतिहास घडविला, पण शून्य जागा जिंकण्याचा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com