प्रशांत किशोर राजकीय पक्ष स्थापन करणार? नव्या ट्विटमुळे खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant Kishor Tweet

प्रशांत किशोर राजकीय पक्ष स्थापन करणार? नव्या ट्विटमुळे खळबळ

नवी दिल्ली : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांची काँग्रेससोबतची चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर किशोर यांच्या भवितव्याबाबत गूढ कायम आहे. त्यांनी आज सोमवारी एक ट्विट केले आहे. लोकशाहीतील खऱ्या समस्या समजून घेण्यासाठी आता खऱ्या लोकांकडे वळणार असून सुरुवात बिहारपासून (Bihar) करणार आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे आता प्रशांत किशोर राजकीय पक्ष स्थापन करणार का? अशी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: "भाजपाला हरवायचं असेल तर..."; प्रशांत किशोर यांचा राजकीय पक्षांना सल्ला

लोकशाहीत सहभागी होण्याचा आणि लोकाभिमुख धोरण तयार करण्यासाठी मदत करण्यात मी १० वर्ष घालवली आहेत. पण, आता लोकशाही-सुशासन समजून घेण्यासाठी खऱ्या हिरोकडे म्हणजे जनतेकडे जाण्याची वेळ आली आहे. याची सुरुवात बिहारपासून करणार आहे, असं ट्विट प्रशांत किशोर यांनी केलं आहे.

मी निवडणुकीचा एक भाग असणार आहे. पण, आधीसारखा नाही, असं त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. तसेच त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही, असंही सांगितलं होतं. आजच्या ट्विटनंतर प्रशांत किशोर खरंच राजकीय पक्ष स्थापन करणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. पण, प्रशांत किशोर नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार की कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

बंगाल निव़डणुकीनंतर मी माझ्या आधीच्या क्षमेतनुसार कोणत्याही पक्षासाठी काम करणार नाही, असं म्हटलं होतं. पण, गोवा निवडणुकीसाठी काम केलं. याचा अर्थ मी कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नाही असं नाही, असं प्रशांत किशोर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

.

Web Title: Prashant Kishor May Form New Political Party Tweet Starts From Bihar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Prashant Kishor
go to top