esakal | प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट

राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची भेट दिल्लीत झाली. यावेळी प्रियांका गांधी आणि केसी वेणुगोपाल राव हेसुद्धा उपस्थित होते.

प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीनंतर चर्चांणा उधाण आले आहे. राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची भेट दिल्लीत झाली. यावेळी प्रियांका गांधी आणि केसी वेणुगोपाल राव हेसुद्धा उपस्थित होते. पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा: देशातील पहिल्या रुग्णाला दीड वर्षानंतर पुन्हा कोरोनाची लागण

प्रशांत किशोर यांनी याआधी तीनवेळा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी तृणमूलसाठी प्रशांत किशोर यांनी काम केलं होतं. तृणमूलने राज्यात 213 तर भाजपने 77 जागा जिंकल्या.

loading image