
PK Hits Back At BJP Over Party Funding Allegations
Esakal
Prashant Kishor: भाजपच्या एका नेत्यानं जन सुराज पार्टीचे प्रमुख प्रशात किशोर यांना त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आणि पक्षाला मिळणाऱ्या निधीवर प्रश्न उपस्थित केला होता. यावर प्रशांत किशोर यांनी गेल्या तीन वर्षात किती रुपये कमावले आणि पक्षाला किती रुपये दिले याचा हिशोब दिलाय. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि खासदार संजय जयस्वाल यांनी जन सुराज पार्टी आणि प्रशांत किशोर यांना पैसे कुठून मिळतात असा प्रश्न विचारला होता. प्रशांत किशोर यांनी एका पत्रकार परिषदेत उत्तर देताना सांगितलं की, सल्लागार म्हणून काम करताना ३ वर्षांत मी २४१ कोटी रुपये कमावले. यातले ९८ कोटी रुपये पक्षाला दान केलेत.