म्हणून काँग्रेससोबत काम करणार नाही, प्रशांत किशोरांनी सांगितलं कारण

prashant kishor said never work with congress party because they spoiled his track record
prashant kishor said never work with congress party because they spoiled his track record

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेस पक्ष ही बुडणारी बोट असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेससोबत काम करण्याबाबत काही दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेत काही कारणांमुळे निर्णय होऊ शकला नाही. आता यानंतर प्रशांत किशोर यांनी सोमवारी बिहारच्या हाजीपूरमध्ये त्यांनी कॉंग्रेस पक्षासोबत कधीही काम करणार नाही, असा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी प्रशांत किशोर यांनी हात जोडून या निर्णयामागील कारण देखील सांगितलं आहे. (prashant kishor said never work with congress party because they spoiled his track record )

काँग्रेस हा असा पक्ष आहे जो स्वतःमध्ये सुधारणा करत नाही आणि आम्हालाही बुडवेल. माझ्या मनात काँग्रेसबद्दल खूप आदर असला तरी काँग्रेसची सध्याची ही स्थिती आहे. 2011 ते 2021 दरम्यान, 11 निवडणुकांशी माझा संबंध आला, ज्यामध्ये फक्त एक निवडणूक हरली होती. ती म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, त्यात मी काँग्रेससोबत होतो. तेव्हापासून मी ठरवले आहे की, मी या लोकांसोबत कधीही काम करणार नाही. या लोकांनी माझा ट्रॅक रेकॉर्ड खराब केला आहे. मात्र, पराभवातून खूप काही शिकण्यासारखे होते, असे ते या वेळी म्हणाले.

prashant kishor said never work with congress party because they spoiled his track record
अहमदनगर : जवखेडे खालसा खटल्यातून तीनही आरोपी निर्दोष
prashant kishor said never work with congress party because they spoiled his track record
हनुमान जन्मस्थळ वाद प्रकरणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बंगालमध्ये भाजपचा सांगून पराभव..

पश्चिम बंगलमध्ये भाजपच्या पराभवाबद्दल बोलताना ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये एक प्रकारे भाजपसोबत एक पैज लागली आहे. भाजप फक्त हरणार नाही तर 100 च्या खाली थांबवू असं आम्ही म्हटलं होतं जर रोखू शकलो नाही तर नोकरी सोडेल. निवडणुकीचे निकाल आले तेव्हा भाजपला 77 रोखलं होतं. देवाचा आशीर्वाद होता. जेव्हा माझं म्हणणं खरं झालं तेव्हा वाटलं या क्षेत्रात पुरेसं झालंय, आता काहीतरी नवीन करूया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com