हनुमान जन्मस्थळ वाद प्रकरणावर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

HM Dilip walse patil on hanuman birth place controversy row
HM Dilip walse patil on hanuman birth place controversy row
Updated on

मुंबई : हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी आहे की किष्किंदा, यावरून वाद पेटला आहे. किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हनुमानाच्या जन्मस्थळाचा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला, दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. (HM Dilip walse patil on hanuman birth place controversy row)

दिलीप वळसे पाटील म्हणाले, "हे वास्तविक प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आहे. लक्ष देऊ नका... भीती आणि मतभेद निर्माण केले जात आहेत. त्यांच्या जन्म स्थानाबद्दल भक्तांना काही फरक पडत नाही, ते त्यांची पूजा करत राहातील."

HM Dilip walse patil on hanuman birth place controversy row
सत्येंद्र जैन यांच्या अटकेवर केजरीवालांची प्रतिक्रियी, म्हणाले...

हनुमान जन्माच्या वादावर चर्चा करण्यासाठी आज नाशिक येथे शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी दाखल झाले. मात्र, त्यांची बैठक सुरू होण्याआधीच राड्याला सुरुवात झाली. आसन व्यवस्था समसमान करण्यात आली नसल्याने काही साधूंना राग आला. साधूंमध्ये खुर्ची चा वाद सुरू झाला. आसनव्यवस्था समसमान करण्याची मागणी करण्यात येत होती. नंतर गोविंदानंद सरस्वती यांनी खाली बसावं अशी मागणी करण्यात आली . तुम्ही विद्वान असाल, साधू असाल, मात्र आमचा मान राखावा असं नाशिकच्या साधूंनी म्हटलंय.

HM Dilip walse patil on hanuman birth place controversy row
वाद हनुमान जन्मस्थळाचा; पण साधूचं भिडले, नाशकात 'खुर्ची'वरून वादंग

हा वाद विवाद सुरू असतानाच गोविंदगिरी यांचे गुरू शंकराचार्य यांना सुधीरदास पुजारी यांनी काँग्रेसी म्हटल्याने वाद चिघळला. गोविंदगिरी यांनी माफी मागण्याची जोरदार मागणी केली, यानंतरच्या गदारोळात सुधीरदास यांनी एका टिव्ही चॅनलचा माईक उगारला. यामुळे गोविंदगिरी भडकले आणि त्यांनी उभे राहून माफी मागण्यासाठी आग्रह धरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 First Installment Of Rs 7000 Crore Approved For Eligible Farmers
solapur midc
solapur chincholi midc
Maharashtra Latest Marathi News Live Update
Marathi News Esakal
www.esakal.com