

Prateek Yadav Had Taken Treatment in Mumbai and Medanta
Esakal
समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा लहान मुलगा प्रतीक यादवचं लखनऊत वयाच्या ३८व्या वर्षी निधन झालं. बुधवारी त्याला लखनऊच्या सिव्हील रुग्णालयात बेशुद्धावस्थेत नेण्यात आलं होतं. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्रतीक यादव हा भाजप नेत्या अपर्णा यादव यांचा पती आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ होते.