
Prayagraj Stray Dogs Issue
ESakal
भटक्या कुत्र्यांची आक्रमक होत चाललेली संख्या आणि मानवांना चावण्याची संख्या पाहता, प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने असा आदेश जारी केला आहे की, जो कुत्रा पहिल्यांदाच माणसाला चावेल त्याला १० दिवस एबीसी सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर त्याच्या शरीरात मायक्रोचिप बसवून त्याला सोडण्यात येईल. त्यानंतर जर कुत्रा पुन्हा एखाद्याला चावला तर त्या कुत्र्याला जन्मठेपेची शिक्षा होईल. त्याला आयुष्यभर एबीसी सेंटर म्हणजेच प्राणी जन्म नियंत्रण केंद्रामध्ये बांधलेल्या आश्रयगृहात ठेवण्यात येईल.