

Prayagraj Police Seize Crores of Rupees Buried in Drums Beneath a House, with Investigators Probing a Possible Pune Company Connection
esakal
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एका व्यक्तीच्या घरात जमिनीखाली पुरून ठेवलेले कोट्यवधी रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. घरातील ड्रममध्ये मोठ्या प्रमाणावर नोटा लपवून ठेवल्याचे तपासात समोर आले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत चार कोटी रुपयांहून अधिक रकमेची मोजणी करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, जप्त केलेली एकूण रक्कम ६० कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नोटांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच नेमकी रक्कम स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास आणि आरोपीची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.