बायकोच्या आठवणीत लिहीले आठ किलोचे पत्र!

husband wrote 8kg love letter the cost of posting 700 rupees
husband wrote 8kg love letter the cost of posting 700 rupees

मेरठ (उत्तर प्रदेश): एका प्रेमवेड्या पतीने पत्नीची आठवणदरम्यान तब्बल आठ हजार पानांचे प्रेमपत्र लिहिले होते. या आठ हजार पानांचे वजन तब्बल आठ किलो होते. घटना वीस वर्षांपूर्वीची असून, जीवनसिंग बिश्त असे प्रेमवेड्या पतीचे नाव आहे. सोशल मीडियावर त्यांची छायाचित्रे व्हायरल झाली असून, ते चर्चेत आले आहेत.

वीस वर्षांपूर्वी पत्र मोठ्या प्रमाणात पाठवली जात होती. कारण, त्याकाळी सोशल मीडियाचा एवढा प्रादुर्भाव नव्हता. शिवाय, फेसबुक, व्हॉट्सऍपसारखे माध्यमही नव्हते. यामुळे अनेक प्रियकर पत्र अथवा चिठ्ठ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करून, प्रेमभावना व्यक्त करत. आजही अनेकांकडे प्रेमपत्राच्या गोड आठवणी आहेत. जीवनसिंग बिश्त यांनी २० वर्षापूर्वी पत्नीच्या विरहातून सतत दोन महिने बसून तब्बल आठ हजार पानी प्रेमपत्र लिहीले होते. त्या कागदांचे वजन आठ किलो होते. शिवाय, पोष्टातून पाठविण्यासाठी त्यांना 700 रुपये खर्च आला होता. हे पत्र त्यांनी आजही सांभाळून ठेवले आहे.

जीवनसिंग बिश्त यांची ओळख रेकॉर्डसिंग अशी सुद्धा आहे. ते आयकर विभागात नोकरी करून निवृत्त झाले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पत्नी कमला उत्तराखंड येथील अल्मोडा येथे राहणारी होती. पण, लग्नानंतर सतत माहेरी जात असायची. पत्नीची सतत आठवण येत असे. पण, त्याकाळी फोन उपलब्ध नव्हता. एकदा पत्नी रागावून माहेरी गेली आणि बरेच दिवस आलीच नाही. त्यामुळे १९९९ मध्ये भलेमोठे पत्र लिहायला सुरवात केली. कामावरून परतल्यावर रात्री जागून पत्र लिहित बसायचो. या पत्रात काय नव्हते? प्रेमाची भाषा होतीच पण दररोज काय-काय घडतेय याचीही माहिती होती. कारगील युद्ध सुरु झाले याचीही माहिती होती. शिवाय, या युद्धात शहीद झालेल्या ५२५ जवानांची शौर्यगाथा सुद्धा होती. ओरिसा वादळात हजारोनी मृत्यू झाल्याची माहिती लिहून झाल्यावर हे पत्र पोस्ट करायचे ठरविले. पण, तेवढ्यात कंधार विमान अपहरण प्रकरण झाले. मग त्याचीही माहिती पत्रात लिहिली. शेवटी आठ किलो वजनाचे हे पत्र तयार झाले. पोष्टात गेल्यानंतर ७०० रुपये भरून ते पत्नीला पाठवले. पत्नीला पत्र मिळाल्यानंतर सुरवातीला ती नाराज झाली होती. पण, जसे वाचत गेली तशी ती भावूक होत गेली.'

दरम्यान, जीवनसिंग यांनी दोन फुट लांबीचे आणि दोन किलो वजनाचे वांगे बागेत पिकवले आहे. लिम्का रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली आहे. जीवनसिंग यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. मुलांचा विवाह झाला आहे. मी लिहीलेले प्रेमपत्र सुद्धा जगातील सर्वात मोठे प्रेमपत्र असल्याचे समजले आहे, असेही जीवनसिंग यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com