Crime News: पतीने गरोदर पत्नीला पलंगाला बाधलं अन् पेटवून दिलं; जुळ्या मुलांची होणार होती आई

Woman Tied To Bed Set On Fire: पंजाबमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गरोदर महिलेला तिच्या पतीने जिवंत जाळलं आहे.
Set On Fire
Set On Fire

नवी दिल्ली- पंजाबमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गरोदर महिलेला तिच्या पतीने जिवंत जाळलं आहे. २३ वर्षीय महिला सहा महिन्यांची गरोदर होती असं कळतंय. महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोडप्यामध्ये काही कारणामुळे शुक्रवारी वाद झाला होता. त्यानंतर आरोपी पतीने पिंकीला पलंगाला बांधले. त्यानंतर त्याने तिला पेटवून दिले. महिलेला जुळी मुली होणार होती. अमृतसरमधील बिल्लेनंगल गावातील ही घटना आहे. (Pregnant With Twins Punjab Woman Tied To Bed Set On Fire By Husband horrifying incident)

Set On Fire
Nashik Fraud Crime News: कटारिया, पारख यांच्या बंगल्यावर छापा! उपनगर पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यात घरझडती

सुखदेव आणि पिंकी यांच्यामधील संबंध ताणले गेले होते. ते गेल्या काही दिवसांपासून छोट्या-मोठ्या कारणांवरुन भांडण करायचे. शुक्रवारी देखील त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर संतापलेल्या सुखदेवने पिंकीला पलंगाला बांधलं अन् तिला पेटवून दिलं. त्यानंतर तो घटनास्थळावरुन पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शनिवारी रात्री आरोपीला अटक केली आहे. तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Set On Fire
Crime News: भाऊ-बहीण घरी मृतावस्थेत, आई गंभीर जखमी; वडिलांबाबत कळताच उडाली खळबळ

राष्ट्रीय महिला आयोगाने यासंदर्भात पंजाब पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. महिला आयागाने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, पंजाबमधील एका व्यक्तीने आपल्या गरोदर पत्नीला जिवंत जाळलं आहे. हे अत्यंत निर्दयी आणि अविश्वनीय कृत्य आहे . एनसीडब्ल्युच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पंजाब डीजीपींना पत्र लिहिलं आहे. त्यांनी आरोपीला पकडण्याची आणि तीन दिवसात अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. (Crime News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com