रोहतास (बिहार) : कराकट तालुक्यातील एका गर्भवती महिलेचा बनावट डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू (Bihar Pregnant Woman Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला संगीता देवी यांच्यावर व्हिडिओ कॉलच्या (Video Call) माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेदरम्यान तिची प्रकृती बिघडली आणि अखेर तिचा मृत्यू झाला.