esakal | गरोदर महिलेची करण्यात आली नसबंदी; अल्ट्रासाऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Pregnant_

बिहारमधील एका गरोदर महिलेची नसबंदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गरोदर महिलेची करण्यात आली नसबंदी; अल्ट्रासाऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा- बिहारमधील एका गरोदर महिलेची नसबंदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या महिलेची नसबंदी करण्यात आली आहे, अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये महिला गरोदर असल्याचा खुलासा झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. घाबरलेल्या कुटुंबीयांनी पीएचसी गाठले आणि डॉक्टरवर निष्काळजीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली. कैमूर जिल्ह्यातील नुआंवच्या पीएसचीमधील ही घटना आहे. 

गुजरातमध्ये भाजपला मोठा झटका! खासदाराने पक्षासह, लोकसभा सदस्यत्वाचा दिला...

आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की नसबंदी यशस्वी झाली आहे. पण, लोकांच्या म्हणण्यानुसार अधिकाऱ्याचे म्हणणं खरे असेल तर याचा अर्थ याची माहिती असताना महिलेची गर्भावस्थेतच नसबंदी करण्यात आली आहे. 

नुआंव गावातील निवासी एनुल हक यांची पत्नी शहजादी बीबी यांची 2 सप्टेंबर 2020 रोजी डॉ. बदुरुद्दीन यांनी नसबंदी केली. गुरुवारी महिलेची तब्यत अचानक बिघडल्याने तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारादरम्यान महिलेची अल्ट्रासाऊंड तपासणी करण्यात आली, तेव्हा महिला गरोदर होती हे स्पष्ट झालं. त्यानंतर कुटुंबीयांनी हॉस्पिटल गाठले.  

सौदीमध्ये महिला अधिकारांची लढाई लढणाऱ्या कार्यकर्तीला 6 वर्षांचा तुरुंगवास

कुटुंबीयांनी मागणी केली आहे की, पीएचसीमध्ये निष्काळजीपणा दाखवणारा पॅथोलॉजिस्ट आणि ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरविरोधात सिव्हिल सर्जन यांनी तत्काळ कारवाई करावी. आरोग्य पदाधिकारी डॉ. महादेव प्रसाद यांनी नसबंदी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे म्हटलं आहे. तसेच महिलेच्या पोटातील बाळ सुरुक्षित असल्याचं सांगितलं आहे. पॅथोलॉजिस्टच्या तपासात मानवी चूक किंवा तांत्रिक चूकीमुळे रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. पण, बाळाला जन्म दिल्यानंतर महिला पुन्हा बाळाला जन्म देऊ शकत नाही.

एनुल हक नुआंव गावामध्ये भाजीचं दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी सरकारच्या कुटुंब नियोजन योजनेअंतर्गत छोट्या परिवाराच्या उद्देशाने पत्नीची नसबंदी केली. पत्नी गरोदर असल्याच्या बातमीने त्यांना धक्का बसला आहे. 

loading image