सिक्कीम मुख्यमंत्रिपदी तमांग यांचा शपथविधी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मे 2019

सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे (एसकेएम) अध्यक्ष प्रेमसिंह तमांग (पी. एस. गोलय) यांनी सोमवारी सिक्कीमच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

गंगटोक ः सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे (एसकेएम) अध्यक्ष प्रेमसिंह तमांग (पी. एस. गोलय) यांनी सोमवारी सिक्कीमच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्यपाल गंगाप्रसाद यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या वेळी तमांग यांच्यासह पक्षातील अन्य 11 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

"एसकेएम'ची स्थापना 2013 मध्ये झाली. सिक्कीम विधानसभेच्या 32 जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत "एसकेएम'ने 17; तर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटने 15 जागा जिंकल्या आहेत. नवे मुख्यमंत्री तमांग अद्याप विधानसभेचे सदस्य नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prem Singh Tamang Sworn In As New Sikkim Chief Minister