बुक बँकच्या आधारे अभ्यास, शाळेसाठी एकच फ्रॉक; मुर्मूंचा शैक्षणिक संघर्ष

मुर्मू यांनी घरातल्या पाच जणांच्या निधनानंतर सासरची सगळी संपत्ती शाळेसाठी दान केली.
Draupadi Murmu Latest Marathi News
Draupadi Murmu Latest Marathi NewsDraupadi Murmu Latest Marathi News

आदिवासी समुदायाच्या द्रौपदी मुर्मू आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती पदी विराजमान झाल्या आहेत. भारताची प्रथम नागरिक बनण्याचा त्यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. त्यांचा स्वभाव, त्यांच्या लहानपणीचे किस्से, त्यांच्याच जवळच्या काही व्यक्तींनी शेअर केले आहेत.

Draupadi Murmu Latest Marathi News
आदिवासी पाडा कोळेवाडी येथे द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल आनंदोत्सव

त्यांच्या शाळेतलेही काही किस्से समोर आले आहेत. द्रौपदी मुर्मू यांचे वडील बिरांच टुडू उपेरबडा गावात प्रधान होते. त्यांचं कुटुंब गरीब होतं. मुर्मू यांच्याकडे शाळेत घालून येण्यासाठी एकच फ्रॉक होता. त्यांच्याकडे कम्पास बॉक्सही नव्हता. तेव्हा शाळेकडून तो त्यांना देण्यात आला. जी मुलं पुस्तकं खरेदी करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी शाळेत बुक बँक असायची. तिथून विद्यार्थी पुस्तकं उधार घेऊन अभ्यास करू शकतात. मुर्मू यांनीही या बुक बँकमधून पुस्तकं घेऊन अभ्यास केलाय.

Draupadi Murmu Latest Marathi News
भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो अन् पूर्णही करु शकतो; शपथ घेताना राष्ट्रपती मुर्मू भावूक

पुढेही त्यांनी शिक्षणासाठी मोठं काम केलेलं आहे. २००९ ते २०१५ या सहा वर्षांमध्ये द्रौपदी मुर्मू यांना आपल्या परिवारातल्या पाच जणांच्या निधनामुळे मोठं दुःख सहन करावं लागलं. या काळात त्यांनी आपल्या घराचंच रुपांतर एका शाळेत केलं आणि या शाळेसाठी आपली सासरची सगळी संपत्ती दान केली. आपला पती आणि मुलांच्या आठवणीत ही शाळा उभारण्यात आली. या शाळेमध्ये १०० च्या आसपास गरीब मुलं शिक्षण घेतात. या शाळेसाठी मुर्मू यांनी साडेतीन एकर जमीन दान केली. ही शाळा मुर्मू यांची मुलगी इतिश्री यांच्या एका ट्रस्टकडून चालवली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com