

ucc bill
esakal
Uniform civil code: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातमधील समान नागरी कायदा विधेयकाला अधिकृत मंजुरी दिली आहे. उत्तराखंडनंतर समान नागरी कायदा लागू करण्यास मंजुरी मिळवणारे गुजरात हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर आता गुजरात सरकार या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच सविस्तर नियमावली जाहीर करणार आहे. त्यानंतर हा कायदा संपूर्ण राज्यात अधिकृतपणे लागू केला जाईल.