Droupadi Murmu Oath Taking Ceremony: असा पार पडेल सोहळा

भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी आज (सोमवारी, ता. २५) संसदेच्या मध्यवर्ती कक्षात (सेंट्रल हॉल) होणार
President Droupadi Murmu Oath Taking Ceremony today
President Droupadi Murmu Oath Taking Ceremony todaysakal

नवी दिल्ली : भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांचा शपथविधी आज (सोमवारी, ता. २५) संसदेच्या मध्यवर्ती कक्षात (सेंट्रल हॉल) होणार आहे. सरन्यायाधीशांनी शपथ दिल्यानंतर नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. यानंतर राष्ट्रपतींचे अभिभाषणही होईल. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत करून ‘एनडीए’च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी विजय मिळवला होता. देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत.

गृहमंत्रालयाने आज काढलेल्या अधिसूचनेनुसार सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास संसदेच्या मध्यवर्ती कक्षामध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पदाची शपथ देतील. या सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंशसिंह, केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे नेते, तिन्ही सेनादलांचे प्रमुख यांच्यासह दोन्ही सभागृहांमधील खासदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व देशांच्या राजदूतांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रपतींचा शपथविधी झाल्यानंतर त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात येणार आहे.

कामकाजाच्या वेळांत बदल

शपथविधी कार्यक्रमामुळे संसद अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाच्या वेळांमध्येही बदलकरण्यात आला आहे. अधिवेशन काळात दोन्ही सभागृहे सकाळी अकराला सुरू होत असली तरी राष्ट्रपतींच्या शपथविधी कार्यक्रमामध्ये खासदारांना सहभागी होता यावे यासाठी सोमवारी सभागृहांचे कामकाज दुपारी दोन वाजता सुरु होईल. या कार्यक्रमामुळे नव्या संसद भवनाचे बांधकामही काही काळासाठी थांबविण्यात येणार आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

शपथविधी सोहळ्यासाठी सर्व प्रमुख व्यक्तींची हजेरी लक्षात घेऊन राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यासाठी संसद भवनाच्या जवळपास असलेली सुमारे तीस सरकारी कार्यालये शपथविधी कार्यक्रम होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये साउथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक, रेलभवन, कृषी भवन, शास्त्रीभवन, वायू भवन, उद्योग भवन, निर्माण भवन यासारख्या मंत्रालयांचा समावेश आहे. या इमारती सकाळी सहा ते दुपारी दोन पर्यंत बंद राहतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com