राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या VVIP ड्युटीवर बोगस डॉक्टर, अयोध्या दौऱ्यात भयंकर सुरक्षा त्रुटी

दरम्यान 2012 मध्ये, बस्ती जिल्ह्यात डॉ. गेंदा सिंह नावाचा एक बोगस डॉक्टर पकडला गेला होता. आता लोक म्हणत आहेत की, गेंदा सिंह आणि विनोद कुमार सिंह एकच आहेत.
Modi Murmu Ayodhya Security breach
Modi Murmu Ayodhya Security breachEsakal

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये मोठा हलगर्जीपणा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांच्या आयोध्या दौऱ्यावेळी त्यांच्या व्हीव्हीआयपी ताफ्यामध्ये एका बोगस डॉक्टरचाही समावेश होता.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मे महिन्यात अयोध्येत आल्या होत्या तेव्हा ही घटना पहिल्यांदा घडली होती तर पंतप्रधान मोदींनी 5 मे रोजी शहराला भेट दिली होती, त्यावेळीही हा बोगस डॉक्टर व्हीव्हीआयपी ड्युटीवर होता.

बनावट पदवीच्या सहाय्याने नोकरी बळकावणाऱ्या डॉक्टरने या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यावेळी वैद्यकीय कर्तव्ये पार पाडली होती. याची संपूर्ण जबाबदारी पदव्या न तपासता पदस्थापना देणाऱ्या जॉइनिंग अधिकाऱ्याची असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान हे प्रकरण वाढणार आहे असे लक्षात येताच या बोगस डॉक्टरने सीएमएसकडे राजीनामा पत्र सादर केले आणि गायब झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने दिलेली केजीएमयू पदवी बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. आता विभागाचे अधिकारी आरोग्य महासंचालक आणि इतर अधिकाऱ्यांना भेटून पुढील कारवाईसाठी त्यांच्या निर्देशांची वाट पाहत आहेत.

Modi Murmu Ayodhya Security breach
Dowry: "लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंची यादी करा अन् वधू वराच्या सह्या घ्या," हुंडा प्रकरणात सुनावणी करताना हायकोर्ट असं का म्हणालं?

सरकारकडून नियुक्ती मिळाल्यानंतर, डॉ. विनोद सिंह 23 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तत्कालीन प्रभारी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. ब्रिजकुमार यांनी पदवीची पडताळणी न करताच त्यांना तात्काळ रुजू करून घेतले.

रुजू झाल्यानंतर डॉ. विनोद सिंग जवळपास दोन महिने हॉस्पिटलमधून गायब राहिले आणि त्यांना त्यांचा पगार वेळेवर मिळत राहिला. यानंतर मीडियाचा दबाव निर्माण झाल्यावर त्यांनी ड्युटी सुरू केली.

कथित डॉक्टरने सहा महिन्यांत दोन डझनहून अधिक व्हीव्हीआयपींची रुग्णवाहिकांची ड्युटी केली आहे.

दरम्यान, त्याच्यावर संशय आल्याने सीएमएसने त्याचा पगार थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या पदवीचे रहस्य उघड होत असल्याचे पाहून तो राजीनामा देऊन निघून गेला.

Modi Murmu Ayodhya Security breach
PM Modi Road Show: "मोदी, भाजप अन् महायुतीला शोभतं का?" पंतप्रधानांच्या रोड शोमुळे , मुंबईकरांचा संताप

दरम्यान 2012 मध्ये, बस्ती जिल्ह्यात डॉ. गेंदा सिंह नावाचा एक बोगस डॉक्टर पकडला गेला होता. याच गेंदा सिंहचा डॉ. विनोद सिंह यांच्याशी संबंध असल्याचे लोक बोलत आहेत.

अटकेदरम्यान, पोलिसांना गेंदा सिंहकडे दोन ड्रायव्हिंग लायसन्स सापडले होते, एक गेंदा सिंहच्या नावाचे आणि दुसरे विनोद कुमार सिंगच्या नावाचे. आता लोक म्हणत आहेत की, गेंदा सिंह आणि विनोद कुमार सिंह एकच आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com